प्रधानमंत्री युवा उद्योजक योजना.


हि योजना प्रामुख्याने नवीन व युवा उद्योकांसाठी आहे. या योजनेच्या साह्याने नवनवीन उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी मदत केली जाते.  या योजने अंतर्गत नवीन उद्योगांना प्रोत्साहन देऊन अर्थ पुरवठा केला जातो. या योजेनचे प्रमुख वैशिट्ये  ग्रामीण उद्योगांना अर्थपुरवठा करून नवनवीन व्यवसायाची उभारणी केली जाते. 

या योजेन मध्ये प्रामुख्याने उत्पादन करणाऱ्या उद्योगांना कर्जपुरवठा केला जातो. 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा मूळ भारतीय असला पाहिजे. यातून होणार कर्जपुरठा प्रधानमंत्री म्हणजे केंद्र सरकारकडून होत असतो. या योजनेचे मुख्य आकर्षण म्हणजे कर्जाचा कालावधी संपल्यानंतर व कर्जाची पूर्ण रक्कम भरल्या नंतर ठराविक दराने सबसिडी कर्जदरास मिळते. 


या योजनेसाठी लागणारे कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत . 

१) आधार कार्ड 

२) पण कार्ड 

३) पासपोर्टसाईज फोटो 

४) डोमिसाईल 

५) शाळा सोडल्याचा दाखला 

६) प्रकल्प अहवाल

७) जात प्रमाणपत्र 

८)लोकसंख्या दाखला  (फक्त ग्रामीणभागासाठी )


महत्वाचे म्हणजे स्कोर कार्ड रिपोर्ट चांगला असणे आवश्यक आहे. 


स्कोर कार्ड साठी आवश्यक कागदपत्रे 

१) रेशन कार्ड 

२) घराचा पुरावा ८ अ 

३) रहिवाशी पुरावा 

४) कर्जासाठी ज्या बँकेत अर्ज केला आहे त्या बँकेत खाते असल्याचा पुरावा. 

 या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील बँकेत आपण अर्ज करू शकता.